Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा परत एल्गार; बदनापूर तालुक्यात जरांगे पाटलांचे जागोजागी स्वागत

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsaam Tv

Manoj Jarange Patil:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावात दाखल होण्यापूर्वी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुणी, बदनापूर,धोपटेश्वर या गावातील मराठा आंदोलकणाच्या भेटी घेतल्या. यावेळी मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जागोजागी स्वागत करण्यात आलं. नानेगाव, भायगाव किनगाव चौफेली मार्गे जरागे पाटील हे सायंकाळी पाचपर्यंत पुन्हा अंतरवाली सराटी गावात दाखल होणार आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. रविवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाठी त्यांनी २९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर जरांगे पाटील यांचे आंदोलन देशभरात चर्चेत आले होते.

दरम्यान राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्लयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. प्रकृती ठीक झाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला बसणार आहेत.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News | 6 दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोडवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com