कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवतोच- राज ठाकरे

आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Speech). गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. संबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत.

आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. बसायला सोडा, उभा राहायला जागा नाही हजारो लोकं येत आहेत, पण जागाच नाही असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात, कोकणातही जाणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. कोंबडं झाकालं तरी सुर्य उगवतोच. जी उरली सुरली राहिली आहे ती औरंगाबादमध्ये काढू असे म्हटलो. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, औरंगाबादेत पिण्याचं प्रश्न आहे, सगळ्याच अडचणी आहेत, मला याची कल्पना असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान सभेअगोदर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुषाश देसाई यांनी राज ठाकरेंवरती टीका केली होती. आजची होणारी सभा ही सुपारी सभा आहे या सुपारी सभेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणाऱ्या 14 मे च्या सभेत समाचार घेतील असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटलं आहे ते औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसैनिकांच्या प्रशिक्षण सभेत बोलत होते. लेका दुपारपर्यंत झोपून राहतोस अन पहाटच्या भोंगाच्या काय त्रास करून घेतोस असा टोमणाही देसाई यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com