रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करण्याची गरज; विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित

चरण स्पर्श दर्शना बाबत पुनर्विचार करण्याची गरज
Pandharpur News
Pandharpur NewsSaam Tv

पंढरपूर - येथील पुरातन असलेल्या विठ्ठलची मूर्ती सुरक्षित आहे तर रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करावा लागणार आहे असे निरीक्षण पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी नोंदविली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

त्यानंतर मंदिर समितीने पुरातत्व विभागाला ही माहिती दिली होती. त्यानुसार आज पहाटे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीची पाहणी केली. पाहणीनंतर श्रीकांत मिश्रा यांनी हे निरीक्षण नोंदवली आहे. विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असून फक्त चरणाच्या काही भागाची भागाची झीज झाली आहे. ती झीज थांबवण्यासाठी मंदिर समितीला तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील पाहा -

दरम्यान रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज मोठ्या प्रमाणात झाली असून लवकरच चरणांवर पुन्हा वज्रलेप केला जाणार आहे. यासंदर्भात मंदिर समितीशी चर्चा करून वज्रलेप करण्याची वेळ आणि तारीख निश्चित केली जाणार आहे. देवाच्या गर्भगृहातील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी काही बदल सुचविण्यात आले आहेत. यामध्ये गाभाऱ्यातील स्टाइल्स काढण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

Pandharpur News
यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागत होती आग; समोर आले मोठे कारण

विठ्ठल रुक्मिणीचे लाखो भाविक चरणस्पर्श दर्शन घेतात यामुळेही चरणांची झीज होते . परंतु हा विषय धार्मिक असल्याने त्या संदर्भातील निर्णय मंदिर समितीने घ्यावा असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. देवाच्या गाभाऱ्यात केली जाणारी विविध फुलांची आरास आणि पूजेचे दरम्यान वापरले जाणारे पंचामृत याविषयी मंदिर समितीला काही प्रमाणात सूचना केल्याचे श्रीकांत मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com