झाडांच्या सान्निध्यात आयुष्य सुंदर बनते- कवी केशव खटिंग

जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरातील ज्ञानगिरी ( ड्रीम प्रोजेक्ट ) माळरानावर रविवारी (ता. ११) आयोजित महावृक्ष लागवड
जिंतूरमध्ये महावृक्ष लागवड
जिंतूरमध्ये महावृक्ष लागवड

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : झाडं माणसांना सावली, प्राणवायू तर देतातच तद्वतच झाडांच्या सान्निध्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य सुंदर बनविण्यासाठीदेखील मदत करतात असे प्रतिपादन कवि केशव खटिंग यांनी केले.

जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरातील ज्ञानगिरी ( ड्रीम प्रोजेक्ट ) माळरानावर रविवारी (ता. ११) आयोजित महावृक्ष लागवड श्रमदान शिबिरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे यांचा सामाजिक संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाईश्री संदीप महाराज शर्मा होते. तर ब्रिजगोपाल तोष्णीवाल, डॉ. दुर्गादास कान्हडकर आदी प्रमुख पाहुणे होते.

हेही वाचा - कंधार तालुक्यातील गणातांडा येथील दिनेश पवार आणि संदीप पवार हे दोघे भावंड शेती कामासाठी गेले असता दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसात आसरा घेण्यासाठी त्यांनी एका झोपडीचा सहारा घेतला

यावेळी उपस्थित मान्यवर, जेएफसी टीमच्या सदस्यांनी तसेच झाड फाउंडेशनसह वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनीही महाश्रमदान शिबिरात सहभाग नोंदवून विविध प्रकारच्या देशी झाडांच्या रोपांची लागवड केली. यात महिला व बालकांचाही सहभाग होता. अॅड मनोज सारडा, कमलकिशोर जयस्वाल, के. सी. घुगे, अरुण शहाणे, अॅड विनोद राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, सुनील भोंबे, नागेश देशमुख, नितीन राठोड, नितीन बंगाळे, सुभाष मस्के, मंचक देशमुख, सचिन रायपत्रीवार, शंकर जाधव, शैलेश रणसिंग, विनोद पाचपिले, प्रा. मुंजाजी दाभाडे, दिलीप चव्हाण, रमेश भराड, रंजना भोंबे, शैलेजा बंगाळे, लता चव्हाण, लीला चव्हाण, मीना भोंबे, रुपाली रणसिंग, सुनिता पाटील, मनीषा वाघमारे, प्रभा दाभाडे, स्मिता निळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी प्रास्ताविक ॲड. मनोज सारडा यांनी तर विनोद पाचपिले यांनी आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com