वाढत्या महागाईस केंद्र सरकार जबाबदार; काँग्रेसची जनजागृती रॅली

या रॅलीत काॅंग्रेसचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
congress awarness program in latur
congress awarness program in latur

लातूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल यासह सर्वच जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड होत चालले आहे. केंद्राच्या चुकीच्या धाेरणांची माहिती देण्यासाठी आज लातूर शहरातील प्रभाग क्रमांक दहा येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. latur congress awarness program in ward about petroleum products

congress awarness program in latur
'या' विधानसभा मतदारसंघातून सोनू सूदची बहीण लढणार निवडणूक

इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणसांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आरंभलेल्या जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून आज (रविवार) लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधून जनजागृती रॅली काढण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात नागरिकांत मोठा संताप दिसून आला अशी माहिती आयाेजकांनी दिली. या रॅलीत काँग्रेस शहराध्यक्ष ऍड. किरण जाधव, दीपक सुळ, प्रवीण सूर्यवंशी आदींसह काॅंग्रेसचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com