Kolhapur News : अखेर कोल्हापुरातील अल्पवयीन मुलगी कर्नाटकात सापडली; नेमकी कशी पोहोचली?

एक अल्पवयीन मुलगी गेल्या सतरा दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर आज, बुधवारी बेपत्ता मुलगी सापडली आहे.
kolhapur crime news
kolhapur crime newssaam tv

>> रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. एक अल्पवयीन मुलगी गेल्या सतरा दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर आज, बुधवारी बेपत्ता मुलगी सापडली आहे. मुस्लिम युवकासह ही मुलगी कर्नाटकात सापडली आहे. सदर प्रकरण लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता. नितेश राणेंनी या प्रकरणावरून आंदोलन केले होते, त्यानंतर शाळकरी मुलगी सापडली आहे.

kolhapur crime news
Mumbai : डॉक्टरांची एक चूक अन् बाळाचा कापावा लागला हात, मुंबईतील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील (Kolhapur) शाळकरी मुलगी अखेर सापडली आहे. मुस्लिम युवकासह मुलगी सापडली आहे. कर्नाटकातील संकेश्वरमध्ये दोघेही सापडले आहेत. दोघांनाही कर्नाटकातील संकेश्वर पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना घेऊन कर्नाटकातील (Karnataka) पोलीस कोल्हापूरला रवाना झाले आहेत. १७ दिवसानंतर दोघेही सापडले आहेत.

kolhapur crime news
Ambernath : दुकानात खाऊ घ्यायला आली, तोंडावर स्प्रे मारत चोरी करून पळाली; अंबरनाथमधील घटना

नेमकं काय घडलं होतं ?

कोल्हापुरातील ही मुलगी 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. दिवाळीपूर्वीच पेपर द्यायला गेलेली मुलगी परतली नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. मुस्लिम युवकाने या मुलीला पळवल्याचा संशय होता. मुस्लीम युवकही या दरम्यान बेपत्ता असल्याने हा संशय बळावला होता. लव्ह जिहादसाठीच मुलीला पळवल्याचा आरोप करण्यात येत होता.

मुलीचा आणि युवकाचा शोध लागत नसल्याने पोलिसांविरोधात रोष होता. पोलिसांकडून तपासाला येत नसल्याने आज आक्रमक झालेल्या हिंदू संघटना आणि आमदार नितेश राणेंनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. सकाळी आंदोलन केल्यानंतर दोघांचा कर्नाटकात शोध लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com