कोल्हापूर: पोलिसांची मोठी कारवाई! आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

आलिशान कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीवर (International Gang) कोल्हापुरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
Kolhapur News in Marathi
Kolhapur News in Marathiसंभाजी थोरात

संभाजी थोरात

कोल्हापूर : आलिशान कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीवर (International Gang) कोल्हापुरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आज, शनिवारी या टोळीला जेरबंद (Arrest) केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडून सुमारे पाच कोटी रुपये किंमतीच्या 31 आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. (Kolhapur News in Marathi)

हे देखील पहा-

याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातील (Karnataka) तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (वय 42, रा. क्रॉस मशीद गल्ली गांधीनगर, जिल्हा बेळगाव), यश प्रशांत देसाई ( वय 26 रा. बोरमाळ शहापूर जिल्हा बेळगाव), खलील महंमद लियाकत सारवान (वय 40 रा. सुभाषनगर जिल्हा बेळगाव ) असे या संशयितांची तिघांची नावे आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (Latest & Breaking Kolhapur news in Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com