कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक सेवा विस्कळीत
कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक सेवा विस्कळीतSaam Tv

कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक सेवा विस्कळीत

मुसळधार पावसाने कसारा घाटात मध्ये रात्री दरड कोसळली आहे.

नाशिक : मुसळधार पावसाने Heavy Rain कसारा घाटात मध्ये रात्री दरड कोसळली आहे. यामुळे कसाऱ्याकडून नाशिककडे Nashik जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकी बरोबरच रेल्वे Railways मार्गालाही देखील याचा मोठा फटका बसला आहे. कसारा घाटामध्ये नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या- येणाऱ्या रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आले आहेत.

दरड कोसळल्यामुळे ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सीएसएमटी CSMT- हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी- लातूर स्पेशल, सीएसएमटी- वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी- भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी- छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल, सीएसएमटी- हजूर साहेब नांदेड स्पेशल या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

शिवाय काही रेल्वे गाड्या अर्ध्यावरच थांबवण्यात आले आहे, तर टकाही रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात देखील आले आहेत. २१११ कल्याण अमरावती एक्सप्रेस खर्डी स्थानकामधेच थांबवली आहे, आता ही ट्रेन मुंबईच्या Mumbai दिशेने परत जाणार आहे. हावडा एक्सप्रेस देखील आसनगाव रेल्वे स्थानकावरच आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस हि देखील बदलापूरला थांबन्यात आली आहे.

कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक सेवा विस्कळीत
मुंबई गोवा महामार्ग ठप्प ; परशुराम घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद

दरम्यान, टिटवाळा- इगतपुरी तसेच अंबरनाथ- लोणावळा या मार्गावर देखील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसाने या मार्गावर पाणी साचले आहे. अंबरनाथ ते सीएसएमटी, टिटवाळा ते सीएसएमटी या रेल्वे मार्गावर देखील लोकल वाहतूक सध्या थोडक्यात सुरु आहे. तरी पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलसेवा ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु केली आहे. वसईचा सनसिटी- गास रस्ता देखील सलग पाचव्या दिवशी देखील पाण्याखालीच राहीला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com