Breaking News: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावनी लांबणीवर

करूणा शर्मा आणि ड्रायव्हर अरूण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
Breaking News: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावनी लांबणीवर
Breaking News: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावनी लांबणीवरSaam Tv

बीड: ५ सप्टेंबर रोजी परळीमध्ये एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना जामीन अर्जावरील सुनावनी पुढे ढकलली आहे. १८ तारखेला पुढील सुनावनी होणार आहे. करूणा शर्मा आणि ड्रायव्हर अरूण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केल्यानंतर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जामीनासाठी त्यांच्या वकिलामार्फत अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी आज होणार होती. आज जामीन मिळतो का आणि जामीन मिळाल्यानंतर करुणा शर्मा यांची भूमिका काय असेल यावर सर्वांचं लागून होतं.

Breaking News: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावनी लांबणीवर
नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोप

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. ५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर परळीतील एका व्यक्तीवर चाकु हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात आता अंबाजोगाई न्यायालयाने शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर सोबत असणाऱ्या अरुण मोरे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. परळी पोलिसांकडून करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयातून, मोठ्या बंदोबस्तात बीडच्या दिशेने नेण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे फेसबुक लाइव्द्वारे जाहीर केले होते. तसेच या सर्व बाबी आपण परळीत (Parali) येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे सांगितले होते. आपल्याला जिवंत जाळण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्या तरीही, पत्रकार परिषद घेणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे बीडसह (Beed) संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com