Kalyan News: संतापजनक! पाच वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षकाची बेदम मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

शिक्षकांनी मुलाला इतके मारले की त्याच्या तोंडावर, हातावर, पायावर मारहाणीचे वण उठले होते.
Crime News, Kalyan
Crime News, KalyanSaamTv

अभिजीत देशमुख..

Kalyan: पाच वर्षीय मुलाला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील आदर्श हिंदि हायस्कूलमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. या मारहाणीत मुलाला दुखापत झाली आहे. या पीडित पाच वर्षीय मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शिक्षक अशोक तिवारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kalyan News)

Crime News, Kalyan
Asaram Bapu Gets Life Imprisonment: मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर कोर्टाचा मोठा झटका

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सदर मुलगा आई वडिलांसह कल्याण पश्चिम परिसरातील चीकनघर परिसरात राहतो .पीडित मुलगा हा कल्याणमधील आदर्श हिंदी हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आहे .काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगा वर्गातील एका मुलाबरोबर मस्ती करत होता .त्यामुळे संतापलेले शिक्षक अशोक तिवारी यांनी या पाच वर्षाच्या मुलाला हाताच्या चापटीने व छडीने बेदम मारहाण केली.

Crime News, Kalyan
MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार? शिंदे-फडणवीस सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

तिवारी यांनी मुलाला इतके मारले की मुलाच्या तोंडावर, हातावर, पायावर मारहाणीचे वण उठले होते. मुलगा घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी त्याची अवस्था पाहिली. त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारकुट्या शिक्षक अशोक तिवारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास सुरू आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com