सत्तार यांना मतिमंद मुलांच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे; आमदार कैलास गोरंट्याल यांची टीका

सत्तार यांना मतिमंद मुलांच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे; आमदार कैलास गोरंट्याल यांची टीका
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : अब्‍दुल सत्तार मोठे झाले पण त्याची बुद्धी मोठी झाली नाही. शिंदे गटाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मतिमंद मुलाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे; अशी जहरी टीका (Congress) काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. (Live Marathi News)

Jalna News
आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा; काही तासातच टोळीचा पर्दाफास

जालन्यात (Jalna) गोरंटयाल यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत गोरंटयाल यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर घणाघाती टीका केली. अब्दुल सत्तार हा मोठा झाला पण त्याची बुद्धी मोठी झाली नाही. अब्दुल सत्तार हा मूर्ख मंत्री आहे असा पुनरुच्चारही गोरंट्याल यांनी केलाय.

सत्‍तारांची मस्‍ती जिरवितो

सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पण माफी मागितली नाही; असे सांगत राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा' एकदा होऊन जाऊ द्या मग दाखवतो. त्यांची मस्ती जिरवतो अशी धमकीही गोरंट्याल यांनी सत्तार यांना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com