Arjun Khotklar : अखेर अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश; भावूक होत म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत...

जालन्यात पत्रकारपरिषद घेत खोतकर यांनी आपण शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
Arjun Khotkar Latest News
Arjun Khotkar Latest News Saam TV

जालना : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर शिंदे गटात जाणाचा निर्णय घेतला आहे. आज जालन्यात पत्रकारपरिषद घेत खोतकर यांनी आपण शिंदे गटाला (Eknath Shinde) पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. यावेळी खोतकर प्रचंड भावूक झाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या परवानगीने, परिवारासाठी मी हा निर्णय घेतोय, हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते. (Arjun Khotkar Latest News)

Arjun Khotkar Latest News
राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचं बिलकूल वाटत नाही : नितेश राणे

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, 'मी पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांसमोर माझी भूमिका स्पष्ट करेन. असं मी काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो. त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत आहे. जालन्यातील साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं आहे. त्यामुळे आज मी त्यांना माझं समर्थन जाहीर करतो आहे'. असं खोतकर यांनी म्हटलं.

जालन्यातील जनतेचे मानले आभार

'मी 1990 मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो. सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो'. असं म्हणत खोतकर यांनी जालन्यातील जनतेचे आभार मानले. (Arjun Khotkar News)

Arjun Khotkar Latest News
Raj Thackeray-Bhagat Singh Koshyari : मराठी माणसाला डिवचू नका; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा

'परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो'

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी त्यांची मुख्य अडचण काय आहे. याबद्दलही स्पष्टीकरण दिलं. खोतकर म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आज जालन्यात येऊन निर्णय घोषित करतोय. आज संजय राऊत, विनोद घोषळकर, नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. घरी आलं की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचे आहेत. मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि यासंदर्भात ते बोलले. मी आज सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागतो'.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com