Jalna Crime : फ्री फायर गेमवरून दोन गटात वाद; चाकू-खंजीरने एकमेकांवर वार, ७ जण गंभीर जखमी

Jalna Crime News : मोबाईल वरील फ्री फायर गेम वर पैसे हरल्याच्या कारणावरून जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली.
Jalna Crime News
Jalna Crime News Saam TV

Jalna Crime News : मोबाईल वरील फ्री फायर गेम वर पैसे हरल्याच्या कारणावरून जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत ७ जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Jalna Crime News
Helicopter Crash : कोलंबियात मोठी दुर्घटना! लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; ४ जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

जालन्यातील मोतीबाग तलाव परिसरात दोन गटात ही धक्कादायक घटना (Crime News) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फ्री गेम च्या हरलेल्या पैशावरून दोन गटात वाद झाला होता, या वादातून एका गटाने दुसऱ्या गटाला वाद मिटविण्यासाठी मोतीबाग परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास बोलावून घेतलं.

दरम्यान, चर्चा सुरू असताना दोन्ही गटात वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की यातून दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. यात चाकूआणि खंजिरने एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात झाल्याने परिसरात एकाच खबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी  (Police) घटनास्थळी धाव घेतली.

Jalna Crime News
Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; गोसावी वस्तीत तरुणावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पोलिसांनी जखमी झालेल्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या हल्यात शेख कैफ, शेख तनवीर, शेख मुसाद्दिक अबुजर, साहिल, शादाब, हे तरुण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णायात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com