Jalna Breaking: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन...

पुंडलिकराव दानवे हे दोन वेळा जालना लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
Jalna Breaking: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन...
Jalna Breaking: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन...Saam Tv

जालना: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे, ते ९४ वर्षांचे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोकरदनचे विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे ते वडील होते. भोकरदन तालुक्यातील सुतार पिंपळगाव येथे झालं निधन त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Jalna Breaking: Former MP Pundalikrao Danve has passes away )

हे देखील पहा -

पुंडलिकराव दानवे हे दोन वेळा जालना लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. १९७७ आणि १९८९ मध्ये दोन वेळा त्यांनी खासदार पद भूषवलं होतं. भाजपकडून ते चार वेळा लोकसभा लढले, मात्र त्यातील एकच निवडणूक ते जिंकले. पुढे १०९० मध्ये रावसाहेब दानवे विधानसभेवर निवडून गेले आणि भाजपमध्ये पुंडलिकराव दानवे मागे पडत गेले. पाचवेळा जालन्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणाऱ्या पुंडलिकरावांना भाजपने तिकीट नाकारलं आणि नंतर मग रावसाहेब दानवे आणि पुंडलिकरावांमधील अंतर वाढत गेलं.

Jalna Breaking: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन...
सर्वांनी अनिल देशमुखांना सांगितलं, जेल जाना पडेगा : साेमय्या

२०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ते म्हणाले होते की, "माझं वय ९२ वर्ष असलं म्हणून काय झालं? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवेंविरोधात लढेन. त्यामुळे वयाच्या ९२ व्या वर्षीही त्याच्यातली राजकीय महत्वाकांक्षा दिसून आली, मात्र आज त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com