आषाढीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चाही केली
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam TV

मुंबई: पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) (१२ जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. (CM Uddhav Thackeray Latest News)

CM Uddhav Thackeray
मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या नेत्यांनी संजय राऊतांविरोधात शरद पवारांकडे तक्रार

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चाही केली. "पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,"अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबतही यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.

CM Uddhav Thackeray
अजित पवारांनी आमच्यासोबत यावं; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

दरम्यान, राज्य सरकारने अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीने समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मुर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com