Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांनी कोरोना लसीबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य

नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी पुन्हा किर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Indurikar Maharaj
Indurikar MaharajSaamTV

सागर गायकवाड -

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पुन्हा किर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोना झालेल्या लोकांना यम त्रास देणार नाही एवढा त्रास घरच्यांनी दिला आहे. तसेच आपण कोरोनाची लस Corona Vaccination घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्य त्यांनी किर्तणात केलं आहे. (Indurikar Maharaj made a controversial statement about corona vaccine)

हे देखील पहा -

एकीकडे सरकार सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच दुसरीकडे भर कीर्तनात 'मी कोरोनाची लस घेणार नाही.' असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं आहे. ते लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरिल वक्तव्य केलं आहे.

Indurikar Maharaj
कॅमेरा सुरु करा.. तुम्हाला शेवटच पहायचाय; Online Class घेत असतानाच शिक्षिकेने सोडले प्राण

तसेच कोरोना बाबत खोटारडेपणा केला असून लोकांनी कोरोना रुग्णांबाबत (Corona patient) भेदभाव केला त्यांनी जिथे हात तिथे हात लावायचा नाही. ते बसतील तिथं बसायच नाही. कोरोना काळात डॉक्टरांच्या हाताखालील कंपाउंडरने देखील गोळ्या लांबूनच दिल्या. कोरोना रुग्णांना मानसिक आधार न दिल्याने जास्त लोक मृत्यू पावले असल्याचही ते म्हणाले. तसंच कोरोनाला एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवा असही इंदोरीकर महाराज यावेळी म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com