हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी; पठ्ठ्याचा बिनधास्त हवेत गोळीबार; पाहा Video

याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असल्याचं दिसत आले.
हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी; पठ्ठ्याचा बिनधास्त हवेत गोळीबार; पाहा Video
हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी; पठ्ठ्याचा बिनधास्त हवेत गोळीबार; पाहा VideoSaam TV

कल्याण : कल्याण जवळील असलेल्या मलंगगड परिसरातील पार पडलेल्या एका लग्नात हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलंगगड परिसरात २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका लग्नातला हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. मलंगगड परिसरातील खरड गावात २९ नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नात शिवाजी पाटील नामक इसमाने मोठ्या बंदूकीतून हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असल्याचं दिसत आले.

घटनेच्या हाकेच्या अंतरावर नेवाळी आणि वाडी पोलीस चौकी आहे. मात्र असे असताना बिनदस्त पणे असा प्रकार करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिललाईन पोलिसांकडून व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे. ज्या बंदूकीतून हा गोळीबार करण्यात आला ती बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती? यासह सर्वच गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com