दारु भोवली! पत्नीनं घेतलं पेटवून पतीचाही मृत्यू; 3 वर्षाचा चिमुकला अनाथ

उसनवारिच्या पैशातून लोक घरी पैसे मागायला येत होते. हेच मेघाला पसंत नव्हते, त्यामुळे सतत महेंद्र आणि मेघा यांच्यात सतत वाद व्हायचे.
दारु भोवली! पत्नीनं घेतलं पेटवून पतीचाही मृत्यू; 3 वर्षाचा चिमुकला अनाथ
दारु भोवली! पत्नीनं घेतलं पेटवून पतीचाही मृत्यू; 3 वर्षाचा चिमुकला अनाथअभिजित घोरमारे

भंडारा: दारुच्या व्यसनाने अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केल्याचं आपण पाहत असतो. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशनच्या हद्दित उघड झाली असून दारू मुळे निर्माण झालेली आर्थिक तंगी दूर करण्यासाठी घेतलेल्या उसनवारीच्या पैशामुळे घरात झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीने स्वता:ला पेटवून घेतल्यावर पत्नीला वाचवायला गेलेल्या पतिचा पत्नी सह मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. यात आई वडिलांना मुकलेल्या त्यांच्या 3 वर्षाचा चिमुकल्यावर मात्र अनाथ होण्याची वेळ आहे.

भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara) पहेला निवासी मेघाचे 4 वर्षापूर्वी टेकेपार डोडमाझरी येथील ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या महेंद्र सिंगाडे यांच्याशी लग्न झाले होते. कालांतराने त्यांना एक मुलगाही झाला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महेंद्र याला दारूचे व्यसन होते. त्याचे हे व्यसन वाढल्याने त्याला आर्थिक पैशांची गरज भासू लागली यातून त्यावर मोठे कर्ज झाले.

दारु भोवली! पत्नीनं घेतलं पेटवून पतीचाही मृत्यू; 3 वर्षाचा चिमुकला अनाथ
Solapur Barshi Scam: 'फटे स्कॅम'च्या उलगड्यासाठी SIT ची स्थापना

उसनवारिच्या पैशातून लोक घरी पैसे मागायला येत होते. हेच मेघाला पसंत नव्हते, त्यामुळे सतत महेंद्र आणि मेघा यांच्यात सतत वाद व्हायचे. काल घटनेच्या दिवशी शनिवारी त्यांच्यात असाच उसनवारीच्या पैशातून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की मृतक मेघाने आपल्या स्वता:वर रॉकेल टाकून पेटवुन घेतले. ह्यावेळी पतीने आपली चूक लक्षात येत पत्नीला जळत्यास्थितीत बघून वाचवायला गेला खरा मात्र तोपर्यंत निर्रथक ठरत पती-पत्नीचा जळून यात मृत्यु झाला. आरडाओरड केल्यानंतर नातेवाईकांना घडलेला प्रकार कळताच कारधा पोलिसांना त्वरित पाचारन करण्यात आले.

मृतकाचे मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास कारधा पोलिस करत आहेत. यात 3 वर्षाचा मुलगा आजी कडे खेळत असल्याने मुलगा सुखरूप बचावला खरा मात्र आई वडिलांच्या दुर्देवी मृत्युने त्याच्यावर अनाथ होण्याची वेळ आली आहे. ह्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जिल्ह्यात आता सर्वस्तरावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com