उल्हासनगर - हिललाईन पोलीस (Hill Line Police) ठाण्याच्या हद्दीत घरफोडी (Burglary) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. वीर तानाजी नगर परिसरात संजय लबाना यांचे घर आहे. ते १२ तारखेला पंजाब (Punjab) येथील अमृतसर (Amritsar) याठिकाणी दर्शनासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरांनी रात्रीच्या सुमारास घराचा लॉक तोडून घरातील सोनं ,चांदी दोन सिलेंडर (Cylinder) आणि रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
हे देखील पहा -
ह्या घटनेची माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरूवात केली. सीसीटीव्हीत (CCTV) दिसणारा सराईत आरोपी राजा उर्फ विरुमल आहुजा याला सुरूवातीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने त्याचे दोन साथीदार बबन उर्फ जमनादास वनीदानी आणि कमला सिंग मोहनसिंग लबाना यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले.
त्या दोघांनाही अटक करून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे. आरोपींनी कशा प्रकारे घरफोडी केली त्याचा डेमोही दाखवला आहे. राजा उर्फ विरुमल आहुजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात ३० पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.आता याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तिघांवर ही गुन्हा दाखल केला असून आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे.ह्या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अजय अहिरे हे करत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.