गरीब मुलाशी लग्न झालेल्या उच्च शिक्षित नववधूने केली आत्महत्या; नवरदेवास केवळ 6 हजार मानधन!

आपला होणारा पती चांगला असावा त्याला चांगल्या पगाराची नोकरी असावी किंवा तो मोठा बिझनेसमन असावा अशी इच्छा सर्वच मुलींची असते.
Nagpur
NagpurSaam Tv

नागपूर: आपला होणारा पती चांगला असावा त्याला चांगल्या पगाराची नोकरी असावी किंवा तो मोठा बिझनेसमन असावा अशी इच्छा सर्वच मुलींची असते. सरकारी नोकरदार मुलगा आपल्याला नवरा म्हणून मिळावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मुलाशी अश्विनीचे तिच्या आई-वडिलांनी लग्न करून दिले. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत असे काही घडले की, त्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला. नववधूने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (Nagpur Crime News)

29 डिसेंबर 2021 ला अश्विनी आणि हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. यांच्या लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करण्यात आला होता. मात्र, मुलीकडील सर्व उच्च शिक्षित आणि नोकरीवर होते. हरिदास हा यवतमाळ जिल्ह्यातील येथील आहे. गरीब घरातील मुलगा आहे. त्याला 2020 मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली होती. तीन वर्षापर्यंत तो शिक्षण सेवेत असल्यामुळे त्याला 6 हजार मानधन मिळत होते. लग्न झाल्यानंतर तो 7 जानेवारीला भाड्याने राहायला आला होता.

Nagpur
Amravati: वस्तीचा पाणीपुरवठाच बंद! पाण्यासाठी दलितांनी सोडलं गाव (पहा Video)

डायरी पोलिसांच्या हाती!

पती-पत्नी आणि मुलीची आजी जलालखेडा येथे भाड्याच्या घरात राहू लागले होते. पती रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जात होता. नववधू गृहिणी असल्यामुळे ती दिवसभर घरी राहत होती. महिलेची आजी तिच्यासोबत राहत होती. परंतु, रविवारी आजी परत गावी केली असता मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या का केली याचा उलघडा झाला नव्हता? पण नंतर तिची लिहिलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली.

हे देखील पहा-

डायरी वाचून पोलिसही हादरले

उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांना त्या महिलेने लिहलेली डायरी सापडली. त्या डायरीत जे लिहले होते ते वाचून पोलिसांना देखील धक्का बसला.

काय लिहिलं होतं डायरीत?

आत्महत्या करणाऱ्या महिलेने त्यात लिहले होते की, ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब आहेत. पण त्यांचे लग्न चांगल्या श्रीमंत घरी आणि उच्चशिक्षित मुलाशी लावून दिले आहे. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित आहे, माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com