ट्रॅव्हल्सच्या खर्चासाठी विवाहितेचा छळ; पतीसह नणंदेवर गुन्हा दाखल
भंडारा : 'लग्नात ट्रॅव्हल्सवर झालेला खर्च व सोन्याचा गोफ माहेरून घेऊन ये, असं म्हणत विवाहितेला मारहाण केल्याचा प्रकार भंडारा (Bhandara) तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगेश महादेव गोस्वामी व सोनाली महादेव गोस्वामी दोन्ही रा. वाटोळा रोड, पडोळेनगर, नागपूर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील धारगाव येथील निशिगंधा या महिलेचा विवाह मंगेश गोस्वामी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी गेली असता मंगेशने लग्नात झालेल्या ट्रॅव्हल्सचा खर्च दिला नाही म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली.
पाहा व्हिडीओ -
तिची नणंद सोनाली ही मंगेशला यासाठी प्रवृत्त करत होती. तसंच माहेरी गेली तर वडिलांकडून ट्रॅव्हल्सचा खर्च व सोन्याचा गोफ घेऊन ये, असे सांगत सदर विवाहितेस मारहाण केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी पती मंगेश व नणंद सोनाली गोस्वामी विरुद्ध भा.दं. वि. च्या कलम ४९८ (अ)३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कारध पोलीस (Police) करत आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.