आमदार पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीत हाणामारी; पडळकरांची गाडी फोडली

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाला आहे.
आमदार पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीत हाणामारी; पडळकरांची गाडी फोडली
आमदार पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीत हाणामारी; पडळकरांची गाडी फोडलीSaam Tv

सांगली: सांगलीच्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गट आमने-सामने आले आहेत. यावेळी पडळकर यांची गाडी फोडली आहे. तर त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. आटपाडी मधील साठे चौकात ही घटना घडली आहे. आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आटपाडी मध्ये पोलीसाची कुमक वाढवली आहे.  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाला आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्यात वेळात....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com