Gadchiroli News: गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, सहा लाखांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांना केली अटक

Gadchiroli Naxal News: गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, सहा लाखांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांना केली अटक
Gadchiroli Naxal News
Gadchiroli Naxal NewsSaam Tv

>> मंगेश भांडेकर

Gadchiroli Naxal News:

गडचिरोली पोलीस दलाने भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान राबवताना तीन नक्षलवाद्यास अटक करण्यात यश मिळवले आहे. तिघांवरही विविध गुन्हे दाखल असून सहा लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.

सर्जू ऊर्फ छोटू बंडू महाका, मधू ऊर्फ अनु महारु कुमोटी, अशोक लाला तलांडी अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. सर्जू हा सन 2010 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत होता.

Gadchiroli Naxal News
India vs Bharat Row: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

त्याचा रेंगेवाही चकमक, नारगुंडा चकमक (2011), कुंजेमर्का चकमक व मर्दहुर चकमक (2017) असे 04 चकमक व घोटपाडी व पेनगुंडा येथील 02 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. (Latest Marathi News)

तसेच माओवादी मधु हा सन 2015 मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन सन 2017 पर्यंत कार्यरत होता. त्याचा मुत्तेमकुही चकमक, दरबा चकमक (2017), कुंडुम चकमक (2016) अशा एकुण 03 चकमक व मौजा गोंगवाडा व घोटपाडी येथील 02 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता.

Gadchiroli Naxal News
Maratha Reservation: जरांगेंना मिळाले इंग्रजांच्या काळातील पुरावे, पुराव्यात मराठ्यांचा कुणबी असा उल्लेख...

तर अशोक लाला तलांडी याला नागरगुंडा पोलीस पार्टी, डी-37 बटा. सिआरपीएफ व विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना ताब्यातघेतले. तो सन 2017 मध्ये छत्तीसगड येथील सँड्रा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाला व त्यानंतर मागील 02 वर्षापासुन स्वत:चे घरी राहून माओवादी चळवळीमध्ये अधूनमधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता. तसेच केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने या तिन्ही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com