SBI मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत करोडोंची फसवणूक!

१२ जणांकडून पैसे घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv

नागपूर: वेस्टर्न कोल्ड फिल्ड आणि एसबीआय मध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत अनेकांना गंडा घालत करोडोची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी यश मिळवलं असून तीन आरोपींना अटक केली आहे, यापैकी एकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांना नोकरीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या टोळी चा पर्दाफास करण्यात यश आलं  आहे. नागपूरच्या ग्रामीण भागातील 9 तर शहरी भागातील 3 अश्या 12 जणांना वेस्टर्न कोल्ड फिल्ड आणि एसबीआय मध्ये नोकरी  लावून देतो अस सांगत प्रत्येक विद्यार्थ्या कडून लाखो रुपयांची रक्कम जमा केली होती.

काही जणांना अपॉइंटमेंट लेटर सुद्धा दिलं होतं मात्र प्रत्यक्षात ते बोगस असल्याचं पुढे आलं या संदर्भातील तक्रार पोलिसांकडे आल्या नंतर त्यांनी तपस सुरू केला आणि यातील मुख्य आरोपी शिल्पा पालपरती, हिला आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली मात्र यातील एक आरोपी अमित कोवे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे यावे असं आवाहन पोलीस करत आहे. हे प्रकरण मोठं असून यात आणखी किती लोकांची फसवणूक झाली याचा शोध पोलीस घेत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com