एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पाेलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल

crime news
crime news

गोंदिया crime news : गोंदिया जिल्हातील तिरोडा तालुक्यात अतंर्गत येणाऱ्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांचा खून झाल्याची घटना घडली आहे. साेमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. four-died-from-bisen-family-gondia-crime-news-sml80

crime news
तेरणा नदी पुलावर भीषण अपघात; कन्नोळीतील एकाचा मृत्यू

या घटनेची माहिती समजताच स्वतः पाेलिस अधीक्षक पाेलिसांच्या फाैजफाट्यास घटनास्थळी आले. यावेळी श्वान पथक देखील घटनास्थळी आणण्यात आले. तूर्तास पाेलिसांनी घटनेबाबत सविस्तर काेणतीही माहिती दिलेली नाही. प्राथमिक माहितीनूसार खून केलेल्याने नंतर गळफास लावून घेतला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

या घटनेत रेवचंद डोगरु बिसेन, मालता रेवचंद बिसेन, पूर्णिमा रेवचंद बिसेन, तेजस रेवचंद बिसेन यांचा मृत्यू झालेला आहे. बिसेन यांच्या घराबाहेर माेठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com