Sangali News : माजी मुख्यमंत्र्याच्या डॉक्टर नातीचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

डॉ. मधु प्रकाश पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Madhu Patil passed away
Madhu Patil passed awaySaam TV

सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु प्रकाश पाटील यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री ९ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मधु यांचं निधन झालं. त्या ४४ वर्षाच्या होत्या. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या त्या बहीण होत्या. (Former Maharashtra CM Vasantdada Patil Granddaughter Dr Madhu Patil Passed Away)

Madhu Patil passed away
Maharashtra Politics : ...तर शिंदे शहीदच झाले असते; दीपक केसरकर काय म्हणाले? वाचा...

शुक्रवारी रात्री मधु पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेनं पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मधु पाटील यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच शनिवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. सांगलीतील त्यांच्या पद्याळे या मूळ गावी त्यांचा अंत्यविधी होईल. मधु पाटील या राजकीय घराण्यातील होत्या. त्यांचे वडील प्रकाशबापू पाटील हे खासदार होते. तर आई देखील कॉंग्रेस पक्षात सक्रीय होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com