नवापूर शहरात दोन गटात तुफान हाणामारी, तलवारीच्या साह्याने हल्ला; चार जण जखमी

नवापूर शहरात प्राथमिक उपचार करून गुजरात राज्यात पुढील उपचारासाठी रवाना केले आहे.
Navapur Police Station
Navapur Police StationSaam Tv

नंदुरबार - नवापूर शहरात अमन पार्क येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. तलवारी, लोखंडी पाईप,लाठ्या काठ्याने दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. यात चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवापूर (Navapur) शहरात प्राथमिक उपचार करून गुजरात राज्यात पुढील उपचारासाठी रवाना केले आहे.

Navapur Police Station
Aurangabad Crime: "साहेब रोजची कटकट एकदाची संपवली"; पत्नीच्या हत्येनंतर पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

नवापूर शहरातील स्टेशन रोड जवळील अमन पार्क येथे काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोठी हाणामारी झाली यामध्ये घरातील टीव्ही, कपाट, खिडक्या घरात तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

शेजारी सोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.यात मोटरसायकल आणि संसारोपयोगी साहित्याची तोड फोड करण्यात आली आहे. यासंदर्भात नवापूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोर एका गाडीतून येऊन घरात घुसून तलवारी लाठीकाठी लोखंडी पाईपाने बेछूट मारहाण व तोडफोड करून चौघांनाही गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद नवापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. तलवारीने हाणामारी करणारे संशयित आरोपी फरार असून नवापूर पोलिस तपास करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com