शेतकऱ्याने चक्क मुगाच्या पिकात लावला गांजा!

गांजाची 405 झाडे ताब्यात घेत तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्याने चक्क मुगाच्या पिकात लावला गांजा!
शेतकऱ्याने चक्क मुगाच्या पिकात लावला गांजा!SaamTvNews

अकोला : पैसे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अकोल्यात एका शेतकऱ्याने अशी काही शक्कल लढवली की तुम्हीही हादरून जाल. या शेतकऱ्याने मुगाच्या शेतात गांजाची (Ganja) लागवड केल्याचा प्रकार कारवाई केल्यानंतर उघड झालाय. मुगाच्या शेतात (Farm) सुमारे 405 गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत गांजाची झाडे जप्त केली आहेत.

हे देखील पहा :

अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शीटाकळी (Barshitakli) तालुक्यातल्या पाटखेड येथील सचिन रमेश महाजन या शेतकऱ्याने उन्हाळी मूगाच्या शेतात गांजा लावला होता. याची माहिती अकोला स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, या शेतकऱ्याकडून तब्बल 65 किलो गांजा पकडला. सोबतचं गांजाची 405 झाडे ताब्यात घेत तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com