गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश; डॉक्टर फरार

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam Tv

जालना - शहरात गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या घटनेनंतर डॉक्टर (Doctor) फरार झाला आहे. सतीश गवारे असं फरार झालेल्या डॉक्टरच नाव आहे. शहरातील ढवळेश्वर परीसरात राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गर्भलिंगनिदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार पुण्यातून (Pune) जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात (Hospital) पाठवून ही कारवाई करण्यात आली.

हे देखील पाहा -

गर्भलिंगनिदान आणि गर्भपातासाठी 40 हजार रुपये घेत असल्याची माहिती या कारवाईतुन समोर आली आहे. या कारवाईनंतर डॉक्टर रुग्णालयात गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी असलेली मशीन घेऊन फरार झाला आहे. रुग्णालयात छापा टाकल्यानंतर गर्भपाताच्या किट,औषधी,वेगवेगळ्या मशीन असे साहित्य पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आलं.

Jalna Crime News
अखेर मुहूर्त ठरला! 7 मे पासून आष्टी ते अहमदनगर रेल्वे होणार सुरू; दानवेंची माहिती

पोलिसांकडून हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून चंदन झिरा पोलीस ठाण्यात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com