अंबाजोगाईत लाच मागितल्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अटक

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजारांची मागितली होती लाच
bribe
bribeSaam Tv

बीड - अंबाजोगाईत सहायक पोलीस (Police) उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक यांना लाच मागितल्या प्रकरणी अटक झाली असून गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि पोलीस नाईक नितीन चौरे अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. शेतीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि तातडीने जामीन करण्यासाठी, तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

हे देखील पाहा-

सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि पोलीस नाईक नितीन चौरे या दोघांनी तडजोडीने 15 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यांनतर ही लाच घेताना सेंगर आणि चौरे या दोघांना, बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दरम्यान अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरचं ही कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस दलातील लाचखोरी समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com