कोरोनाकाळात सायकलची मागणी वाढली, किंमतही वाढ

तंदुरुस्तीसाठी सायकल चालविणाऱ्यांची संख्या लॉकडाऊन काळात वाढली.
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

बुलढाणा - सायकलसाठी (Bicycle) लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने उत्पादन कमी झाले आहे. सध्या शाळा- महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्यांमुळे पालक मुलांसाठी सायकल खरेदी करत आहेत. तसेच तंदुरुस्तीसाठी सायकल चालविणाऱ्यांची संख्या लॉकडाऊन काळात वाढली. त्यामुळे सायकलला पसंती मिळू लागली होती, मात्र स्टील व कच्च्या मालाचे दर वाढल्याने व मागणी वाढल्याने सायकलच्या किंमतीही वाढल्या आहेत.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे असंख्य उद्योगांचा आलेख घसरला आहे. मात्र, या काळात भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले होते. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच कोरोना लॉकडाऊन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल 20 टक्क्यांनी वाढली होती.

हे देखील पाहा -

क्रिसिल या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. सध्या हि सायंकाळलाच जास्त पसंती असून मेटलच्या वाढलेल्या किंमती, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दर आणि वाढलेला वाहतुकीचा खर्चया सर्वाचा परिणाम सायकलच्या किंमतीवर झाला आहे. त्यामुळे सायकलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सायकलच्या किंमती कोरोनानंतर (Corona) १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायामाचे महत्त्व वाढले. परंतु व्यायामशाळांसह व्यायामाच्या अन्य पर्यायांवरील निर्बंध कायम राहिल्याने अनेकांनी सायकलिंगचा पर्याय निवडला. त्यामुळे शहरी भागातील सायकलचा वापर वाढला.

Buldhana News
'मला कुणी समजून घेत नाही…' गळफास घेऊन १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

दररोज सायकल चालवल्याने पोटचा घेरा कमी होतो. तसेच गुडघेदुखी-टाचदुखी कमी होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सायकलला पुन्हा पसंती मिळू लागली. लाइफटाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून सायकलची निवड होऊ लागली. कोरोनानंतरच्या काळातही सायकल चालविणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

सायकलमुळे अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदे झाले आहेत. त्यामुळे महाग असली तरी उत्तम दर्जाच्या सायकल खरेदीकडे सायकलप्रेमींचा कल आहे. कोरोनानंतर वाढलेला वाहतूक खर्च, सायकलच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे आपसुकच सायकलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. तरीही सायकल ही सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com