शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रयोग, पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी; पाहा Video

कृषी क्षेत्रात दिवसें- दिवस प्रगती होत आहे. आधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आणि धोकेही कमी झाले.
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रयोग, पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी; पाहा Video
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रयोग, पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी; पाहा VideoSaam TV

संजय राठोड

यवतमाळ: कृषी क्षेत्रात दिवसें- दिवस प्रगती होत आहे. आधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आणि धोकेही कमी झाले. पिकांवर फवारणी करताना बिषबाधेचा धोका असायचा. मजुरही मिळत नाही. आता ड्रोनद्वारे फवारणी करता येणार असल्याने विषबाधेचा धोका कमी झाला आणि मजुर शोधण्याची झंझट राहणार नाही. बोरगावच्या अजय दिपक पाटील व अंकुश या भावंडांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

अजय पाटीलने वकिलीचे शिक्षण घेतले असून त्याला अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष आवड आहे. तर, अंकुश येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक आहे. वेगळे काहीतरी करून दाखविण्याचा नाद दोघांनाही आहे. २०१७ -१८ मध्ये पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे जिल्ह्यातील २१ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. यावर ड्रोन हा पर्याय ठरू शकतो का, हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी विदेशातून साहित्य बोलावून ’ड्रोन’ची जोडणी केली. त्याचा पिकांवर फवारणीसाठी प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला.

ड्रोनद्वारे एका एकरातील पिकांवर पाच मिनिटांत फवारणी करता येते. ऊस, तूर, सोयाबीन, चना, केळी, हळद, अद्रक, टरबूज आदींसह मोसंबी, संत्रा, कापूस आदींवर फवारणी करणे सुलभ होते. या फवारणीत कीटकनाशक औषधांचे प्रमाण कमी लागते. तसेच पाणीही खूप लागत नाही. धुक्यासारखे बिंदू पिकांवर पसरतात. शेंड्यावरील कोवळ्या पानांवर पडतात. प्रतिकिमी १०० च्या गतीने फवारणी केली जाते. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होऊन औषध पिकांवरच फवारले जाते. फवारणीसाठी तीन प्रकारचे ड्रोन तयार करण्यात आले असून त्याची क्षमता १६,१० व २२ लिटर इतकी आहे. हे ड्रोन बॅटरीवर चालतात. गेल्या दोन दिवसांत बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथील पवन मानलवार यांच्या शेतातील तुरीवर व आलेगाव येथील मुन्ना पटेल यांच्या शेतातील केळीवर फवारणी करण्यात आली. उमरी येथील संदीप उपलेंचवार यांच्या शेतात तनाशक फवारणीसाठी मजुर मिळत नसल्याने ड्रोन हा चांगला पर्याय ठरू शकते, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रयोग, पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी; पाहा Video
देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय! ; सौरभ कृपाल बनले पहिले 'समलैंगिक जज'

यवतमाळ जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने ड्रोनने कीटकनाशक फवारणी करण्यासाठी परवानगीची गरज भासत नसल्याचे अजय पाटील यांनी सांगितले. कमी खर्चात शेतकर्‍यांना फवारणी करता येणार आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून प्रतिसाद मिळाल्यास शेतकर्‍यांना ड्रोन विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ तसेच ड्रोनची सेवा देऊ असेही त्यांनी सांगितले. रायगड, राजगड, शिवनेरी आदी किल्ल्यांवर ड्रोनद्वारे हवाई बी-पेरणी केली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कोकण आदी भागात ड्रोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com