स्पिरिटसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

स्पिरिटसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Dhule News
Dhule NewsSaam tv

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दहिवद (ता. शिरपूर) गावाजवळील हॉटेलवर थांबलेल्या ट्रकमधून १७ हजार ६०० लिटर स्पिरिट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. सोमवारी (ता. १३) मध्यरात्री साडेबाराला केलेल्या या कारवाईत (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील संशयिताला अटक झाली. (dhule news shirpur 23 lakh confiscated Action of State Excise Department)

Dhule News
चोरीच्‍या घटनांचा लागला छडा; सराईत चोरटा ताब्‍यात

महामार्गावर स्पिरिटची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे यांना (Dhule News) मिळाली होती. त्यांनी रविवारी रात्रीपासून महामार्गावर दहिवद शिवारातील माँ करणीकृपा हॉटेलवर सापळा रचला. मध्यरात्री बाराला संशयित दहाचाकी ट्रक (एमएच ४८, सीबी ३७४६) आल्यावर पथकाने थांबविली. चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय बळावला.

१७ हजाराचे स्पिरिट

ट्रकची झडती घेतली असता प्लॅस्टिकच्या ८८ बॅरलमध्ये १७ हजार ६०० लिटर स्पिरिट भरल्याचे आढळले. ट्रकसह या मुद्देमालाची एकूण किंमत २२ लाख ८२ हजार ५०० रुपये आहे. संशयित चालक दीपक केशरी माटे (रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. हांडे, बापूसाहेब महाडिक, हाडाखेड कार्यालयाचे दुय्यम निरीक्षक सागर चव्हाण, एस. एस. आवटे, एस. एस. शिंदे, बी. एस. चोथवे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. गोवेकर, जवान गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, जितेंद्र फुलपगारे, अमोल धनगर, के. एम. गोसावी, मनोज धुळेकर, दारासिंग पावरा, रवींद्र देसले, नीलेश मोरे यांनी ही कामगिरी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com