दहीहंडी उत्सवावर निर्बंध..धुळ्यात मनसेतर्फे बालगोपाळाला उभे करत निदर्शने

दहीहंडी उत्सवावर निर्बंध..धुळ्यात मनसेतर्फे बालगोपाळाला उभे करत निदर्शने
MNS
MNS

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणउत्सव राज्य शासनातर्फे रद्द करण्यात येत आहेत. आगामी दहीहंडी उत्सवावर देखील निर्बंध लादण्यात आल्यानंतर या विरोधात धुळ्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. (dhule-news-Restrictions-on-Dahihandi-festival-Demonstrations-by-MNS)

एकीकडे सर्वच राजकीय सोहळे व्यवस्थित पार पडत असताना दुसरीकडे मात्र सणवारांवरच ठाकरे सरकारतर्फे गदा आणली जात असल्याचा आरोप मनसेतर्फे लावण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर मनसेतर्फे राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी धुळे शहरातील महाराणाप्रताप चौकामध्ये निदर्शने करण्यात आले आहेत.

MNS
भाजी विक्रेत्‍याची आत्‍महत्‍या; खिशात सापडली चिठ्ठी

तर मनसे स्‍टाईल आंदोलन

बालगोपाळ कृष्णालाच या आंदोलनामध्ये सामील करण्यात आले होते. तीघाडी सरकारचे डोके ठिकाणावर येउ दे.. असे मागणे यावेळी या बालगोपाळ कृष्णाकडे मनसेतर्फे करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विरोधामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. तसेच लवकरात लवकर दहीहंडी उत्सवाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com