Dhule: जिल्‍ह्यात आतापर्यंत १६१ मीमी पाऊस; जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ

जिल्‍ह्यात आतापर्यंत १६१ मीमी पाऊस; जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ
Dhule News Heavy Rain
Dhule News Heavy RainSaam tv

धुळे : यंदा पावसाचे आगमन जिल्ह्यात उशिरा झाले असले तरी गेल्या आठवडाभर झालेल्या पावसाने मात्र प्रकल्पांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 161.2 मी.मी इतका पाऊस (Rain) झाला आहे. (Dhule Rain Today Update)

Dhule News Heavy Rain
Indore- Amalner Bus Accident: दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक व जखमींना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर

साक्री (Sakri) तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पांझरा, मालनगाव, नामखेडी व बुराई हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर अक्कलपाडा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com