तलवारसाठा प्रकरणी आणखी दोन आरोपी ताब्‍यात

तलवारसाठा प्रकरणी आणखी दोन आरोपी ताब्‍यात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : सहा दिवसांपूर्वी धुळ्यातील सोनगिरी पोलिसांनी जवळपास ८० धारदार शस्त्राचा साठा कारसह पकडला होता. यामध्ये चार आरोपींच्या पोलिसांनी (Police) मुसक्या देखील आवळल्या होत्‍या. त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे जालन्यातून आणखीन दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (dhule news police Two more accused in sword case)

चौघा जणांच्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुसक्या आवळल्या होत्या. आता पुन्हा जालन्यातून (Jalna) दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. एकंदरीत या प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा आरोपींच्या मुसक्या धुळे (Dhule) पोलीसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणाचा लवकरच छडा लागणार असल्याचे संकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com