Corona Vaccination: बारा वर्षांपुढील मुलांकडून अल्प प्रतिसाद

बारा वर्षांपुढील मुलांकडून अल्प प्रतिसाद
Corona Vaccination Updates
Corona Vaccination UpdatesSaam tv

धुळे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरवात झाली आहे. मात्र, लसीकरणास अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आतापर्यंत केवळ ७० ते ८० मुलांनी लस घेतली आहे. (dhule news corona vaccination no response from children under twelve)

Corona Vaccination Updates
Kankavali: संतोष परब हल्ला प्रकरणी पुण्यातील दाेघांना अटक; आज न्यायालयात नेणार

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात १७ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) सुरू झाले आहे. पाच केंद्रांत लसीकरणाची सोय आहे. त्यानुसार सोमवारी (ता. २१) सरासरी २३ मुलांचे लसीकरण झाले. परीक्षेचे दिवस असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. महापालिका (Corporation) आरोग्य विभागाने शाळांना लसीकरणासाठी आवाहन केले आहे. शाळांनी तयारी दर्शविल्यास शाळेत लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. मात्र, काही शाळांत लवकरच परीक्षा सुरू होणार असल्याने, तर काही शाळांत ती सुरू असल्याने पालक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे.

पालकच पुढे येईनात

लसीकरणाला मुलांकडून (Dhule News) अल्प प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य विभागाचा ताण वाढला आहे. सध्या शहरातील महापालिकेच्या पाच आरोग्य केंद्रांत बारा वर्षांपुढील मुलांसाठीच्या लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच ठिकाणी लाभार्थी ऑनलाइन नोंदणी व ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सोय केली आहे. तरीही कमी प्रतिसाद मिळत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येऊन गेली, बाधितांची संख्या वाढली. मात्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. मात्र, दक्षतेसाठी शासनाकडून १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मुलांच्या लसीकरणासाठी पालक फारसे पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकांनी स्वत:हून पुढे येत लसीकरण करून घेण्यावर भर दिला पाहिजे, असे आरोग्य विभागाला वाटते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com