मातोश्रीवर परत या..कृषिकन्येची मंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्त हाक

मातोश्रीवर परत या..कृषिकन्येची मंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्त हाक
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : साध्याच राज्याच राजकीय वातावरण ज्या पद्धतीने तापले आहे. ज्‍या पद्धतीने राजकीय खेळ खेळले जात आहेत. त्यावर धुळ्यातील साक्री येथील सर्वसामान्य कृषिकन्येने मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना परत मातोश्रीवर येण्याची आर्त हाक दिली आहे. आगामी काळात राजकारणात येऊ बघणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढीसाठी वापस या असं म्हणत या कृषिकन्येने मंत्री एकनाथ शिंदे यांना वापीस (Dhule News) परतण्याची विनंती केली आहे. (dhule news Come back to Matoshri Eknath Shinde through social media)

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Shiv Sena) नावासमोर नेहमीच एकनिष्ठ असे वाक्य वापरले जात होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून बंडखोर हे नाव ऐकून मनाला फार त्रास होत असल्याची देखील भावना यावेळी या कृषिकन्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या नावासमोर आगामी काळात बडवे हा शब्दप्रयोग लागू नये. यापूर्वीच मातोश्रीवर पुन्हा परत या अशी आर्त हाकच या तरूणीने मंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com