परिवहन मंत्री परब खाते सांभाळण्यात असमर्थ; विनायक मेटे यांचा आरोप

परिवहन मंत्री परब खाते सांभाळण्यात असमर्थ; विनायक मेटे यांचा आरोप
विनायक मेटे
विनायक मेटे

धुळे : एसटी कर्मचारी मागण्यांसाठी वारंवार संप पुकारत आहेत. त्‍यांची दिवाळी अंधारात गेली असून आता देखील संप पुकारला आहे. मुळात एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारचे लक्ष नसून परिवहन मंत्री अनिल परब हे खाते सांभाळण्यात असमर्थ असल्‍याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी केला आहे. (dhule-news-Allegation-of-Vinayak-Mete-Transport-Minister-unable-to-handle-anil-Parab)

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमासाठी विनायक मेटे हे आले होते. या दरम्‍यानच्या कार्यक्रमप्रसंगी धुळ्यात आले असता आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक मेटे
कापसाची विक्रमी दराकडे वाटचाल; खानदेशात नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलवर खेडा खरेदी

सरकारला भान नाही

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतांना या संपावर बोलतांना शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागत, परिवहन मंत्री अनिल परब हे खाते सांभाळण्यात असमर्थ ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या खात्याकडे लक्ष घालावे. त्याचबरोबर जवळपास ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे म्हणत सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना एसटी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी अंधारातच साजरी झाली असल्याचे भान राज्य सरकारला राहिल नाही. यानिमित्ताने मेटे यांनी ठाकरे सरकार सक्षम अपयशी ठरले असल्याचा आरोप यावेळी लावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com