Raigad Accident Update : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातातील मृतांची संख्या 10 वर, पाच वर्षीय लहानग्याचाही मृत्यू

इको कार आणि ट्रक यांची समोरसमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
Raigad Accident
Raigad AccidentSaam TV

>> सचिन कदम

Raigad Accident News Update : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव अपघातातील मृतांची संख्या दहावर पोहोचली आहे. अपघातात बचावलेल्या पाच वर्षांच्या लहानग्याचाही मृत्यू झाला आहे. भव्य निलेश पंडित असे मृत मुलाचे नाव आहे. उपचारासाठी मुंबईला नेत असताना वाटेतच भव्यचा मृत्यू झाला आहे. भव्यच्या मृत्यूनंतर अपघातातील मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.

Raigad Accident
MBBS Students : 'एमबीबीएस' च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तीन कोटी तीस लाखांची फसवणूक; पाच अटकेत

इको कार आणि ट्रक यांची समोरसमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने ही घटना घडली. (Latest Marathi News)

Raigad Accident
Sindhudurg News: मुंबई-गोवा महामार्गावर आरामबस उलटली; चार जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

सिंधुदुर्गात बसला अपघात, चौघांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com