mahadev sargar
mahadev sargar saam tv

'संकेतचा वडील असल्याचा अभिमान'; वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाल्यानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

संकेत महादेव सरगरने ५५ किलो वेटलिफ्टिंग मध्ये भारताला पाहिले पदक मिळवून दिले आहे. संकेतच्या यशाचं संपूर्ण देशभर कौतुक होत आहे. 'संकेतचा वडील असल्याचा अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संकेतच्या वडील महादेव सरगर यांनी दिली.

सांगली : सांगलीतील (Sangli) चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम ( इंग्लड ) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत (CWG) रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने ५५ किलो वेटलिफ्टिंग मध्ये भारताला पाहिले पदक मिळवून दिले आहे. संकेतच्या यशाचं संपूर्ण देशभर कौतुक होत आहे. 'संकेतचा वडील असल्याचा अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संकेतचे वडील महादेव सरगर यांनी रौप्यपदक पटकाविल्यानंतर दिली. (CWG Sanket Sargar Silver Medal News In Marathi )

mahadev sargar
CWG 2022 : चहावाल्याच्या मुलाचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 'तडका'; भारताला मिळवून दिलं सिल्व्हर मेडल, महाराष्ट्रात जल्लोष

संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते आहे. सांगली शहरातील संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे.सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले,सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल याठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे.पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दाम्पत्य राबतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली.

संकेतच्या यशानंतर त्याचे वडील महादेव सरगर म्हणाले, 'माझ्या मुलाने पदक मिळवलं, ती आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आम्ही त्याच्यासाठी जे कष्ट घेतलं, त्यानं त्याला न्याय दिला. त्यात संकेतच्या प्रशिक्षकाने जे कष्ट घेतलं, त्यालाही त्यानं न्याय दिला. संकेतचा वडील असल्याचा अभिमान वाटत आहे. माझा मुलगा संकेत आणि मुलगी काजल या दोघांनी देशात खूप नाव कमवावं. त्याचे ऑलम्पिकसाठी प्रयत्न सुरू आहेत. तो ऑलम्पिकमध्ये देखील यश संपादन करेल'.

mahadev sargar
राहुल द्रविडच्या 'त्या' प्लानवर टीम इंडियाचा माजी कर्णधार भडकला

संकेतने कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्यानंतर त्याची आई राजश्री सरगर या म्हणाल्या की, 'आमचा हॉटेलचा व्यवसाय आहे. माझे दोन्ही मुलेही खूप कष्ट करतात. आम्हाला तीन मुले आहेत. माझे दोन्ही मुलं वेटलिफ्टिंग करतात. एक मुलगा शिक्षण घेत आहे. हॉटेलात जास्त ग्राहक असल्याने आजही आम्हाला टीव्ही पाहायला मिळाला नाही. त्याच्या सरांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे खूप आभार. त्याचा सर्व खर्च त्याचे सर पाहत होते. आमच्याकडून काही थोडाफार खर्च करण्यात येत होता. त्यामुळे त्यांचे खूप आभार'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com