३५ वर्षांपुर्वी केला होता गुन्हा; वयाच्या ७० व्या वर्षी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Railway Police Arrested Accused After 36 Years : तरुणपणात केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला आता म्हातारपणात भोगावी लागण्याची शक्यता आहे.
Nagpur News, Nagpur Crime News, Nagpur Latest Marathi News
Nagpur News, Nagpur Crime News, Nagpur Latest Marathi Newsमंगेश मोहिते

नागपूर: कायद्याचे हात लांब असतात असं आपण अनेकदा ऐकतो. याच घटनेचं एक ताजं उदाहरण नागपूरमध्ये (Nagpur) पाहायला मिळालंय. एका आरोपीने ३५ वर्षांपुर्वी गुन्हा केला होता. १९८६ मध्ये केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याला २०२२ मध्ये म्हणजे तब्बल ३६ वर्षांनंतर अटक (Arrested) करण्यात आली आहे. सुरेशकुमार रामरतन बनवारी असं या आरोपीचं नाव असून आज त्याचं वय हे ७० वर्षे इतकं आहे. तरुणपणात केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला आता म्हातारपणात भोगावी लागण्याची शक्यता आहे. ३६ वर्षे तो फरार होता, मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (The crime was committed by the accused 35 years ago; At the age of 70, he was caught by the Nagpur Railway Police)

(Nagpur Crime News)

हे देखील पाहा -

आरोपी सुरेशकुमार रामरतन बनवारी पोर्टर म्हणून कामाला असताना स्टेशन मास्टरने एकदा त्याची गैरहजरी टाकली होती. यामुळे रागाच्या भरात त्याने स्टेशन मास्तरला धमकी देऊन स्टेशन मास्टर कार्यालयात तोडफोड केली होती. हा गुन्हा केला तेव्हा आरोपीचे वय ३५ वर्षे होते. आता जेव्हा त्याला अटक करण्यात आली आहे, तो ७० वर्षांचा आहे. सुरेशकुमार रामरतन बनवारी हा १९८६ मध्ये पोर्टर म्हणून रेल्वेत कामाला होता. स्टेशन मास्टरने गैरहजेरी टाकल्यामुळे त्याने धमकी देऊन स्टेशन मास्टर कार्यालयात तोडफोड केली होती.

Nagpur News, Nagpur Crime News, Nagpur Latest Marathi News
पाेस्टमास्तरने खेळला सव्वा काेटी रुपयांचा सट्टा; ठेवीदार अडचणीत, पाेलीस तपास सुरु

याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट दिल्यामुळे लोहमार्ग पोलीस (Railway Police) त्याचा शोध घेत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो डीआरएम कार्यालय, नागपूर येथे आला होता. त्यानंतर तेथून तो छिदवाडा येथे जाण्यासाठी ईतवारी रेल्वे स्थानकावर गेला. मात्र यावेळी पोलीस अगोदरच त्याची वाट पाहात होते. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्यामुळे कायद्याच्या न्यायालयात उशीरा का होईना गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडिताला न्याय मिळतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता वयाच्या ७० व्या वर्षी या आरोपीला कोर्ट काय शिक्षा देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com