Palghar Good Thief: चोर असावा तर असा! तब्बल 15 तोळे सोने परत केले, चिट्ठीतील मजकुराने तर मन जिंकलं

Thief Returned 150 Gram Gold In Palghar : पालघरमधील केळवे पोलीस ठाणे अंतर्गत ही घटना समोर आली आहे.
Palghar Gold Theft
Palghar Gold TheftSaamTV

Palghar News : चोरांना दया, माया नसते. लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा, दागिने यावर डल्ला मारताना ते एकक्षणही विचार करत नाहीत. सगळे चोर असेच असतात? तर नाही. कारण पालघरमधील एका चोराच्या कृतीने पोलिसांसह सर्वांचच मन जिंकलंय.

पालघर पोलिसांनी केलेल्या भावनिक आव्हानाला साथ देत एका चोरट्याने तब्बल 15 तोळे सोने मालकाला परत केले आहे. पालघरमधील केळवे पोलीस ठाणे अंतर्गत ही घटना समोर आली आहे.

Palghar Gold Theft
Pune News : कोल्हापुरातील परिस्थिती चिघळल्यानंतर पुणे पोलिसांची सावध भूमिका, अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

केळवे पोलीस ठाणे अंतर्गत राहणाऱ्या प्रतीक्षा ठकसेन तांडेल यांच्या घरी 31 मे रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणात तांडेल कुटुंबियांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Crime News

ठकसेन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांना आवाहन केलं. या आव्हानाला साथ देत पाझर फुटलेल्या चोरट्याने तीन दिवसानंतर तब्बल 15 तोळ सोने रात्रीच्या सुमारास प्रतीक्षा यांच्या भावाच्या घरा समोर आणून ठेवलं.  (Latest Marathi News)

Palghar Gold Theft
Pune Crime News: पुण्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेलं, सैफवर गुन्हा दाखल

मला माफ करा, अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चिठ्ठी देखील चोरट्याने लिहिलं. या घटनेने फिर्यादींना आपलं सोन पुन्हा मिळालं असून त्यांनी पोलिसांचेही आभार मानले आहेत. तर दुसऱ्या बाजूला हे जनसंवाद अभियानाचं यश असल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com