क-हाडात काेराेनाचा विळखा घट्ट; दिवसात नवे 247 रुग्ण,13 मृत्यू

corona update
corona update

सातारा : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्यात आज (गुरुवार) एक हजार 17 नव्या रुग्णांची भर एकूण संख्येत पडली आहे. गत 24 तासांत जिल्ह्यात 20 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या काही दिवासांपासून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेविड 19 ची वाढती साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे. याबराेबरच जिल्ह्यात मृत्यूचेही प्रमाण गेल्या काही दिवसांपासून स्थिर असून, कमी होताना दिसत नाही. (covid19-patients-increased-satara-coronavirus-news)

सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 15 हजार 181 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1017 नागरिकांना काेराेनाची बाधा corona update झाल्याचे आढळले आहे. कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक 247, सातारा तालुक्‍यात 195, फलटण तालुक्यात 105 बाधित आढळले आहेत. याबराेबरच कऱ्हाड तालुक्‍यात 13 बाधितांचे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यात काेविड 19 च्या तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तसेच आज अखेर बाधित रुग्णांची संख्या अशी जावली 31 (8971), कराड 247 (31653), खंडाळा 94 (12382), खटाव 74 (20588), कोरेगांव 90 (17958), माण 64 (13793), महाबळेश्वर 10 (4407), पाटण 59 (9221), फलटण 105 (29388), सातारा 195 (42805), वाई 38 (13420) व इतर 10 (1505) असे आज अखेर एकूण 206091 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

corona update
लढवय्या जवानाचे धुमधडाक्यात स्वागत; ग्रामस्थांचा ऊर भरुन आला

आज (गुरुवार) मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तसचे आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अशी जावली 1 (186), कराड 13 (947), खंडाळा 0 (156), खटाव 0 (491), कोरेगांव 1 (387), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(312), फलटण 1 (487), सातारा 1 (1267), वाई 1 (309) व इतर 0 (71). आज अखेर जिल्ह्यात एकूण 4986 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आराेग्य विभागाने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com