Maharashtra Corona Update: महाराष्ट्राच्या चिंतेत भर; कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Corona News Updates
Corona News UpdatesSaam Tv

मुंबई : गेल्या महिन्यात कोरोना संसर्ग (corona infection) आटोक्यात आल्यावर कोरोना निर्बंधापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने राज्यातील सर्वच निर्बंध हटवून काही काळानंतर मास्कमुक्तीही केली. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ (corona new patients) होत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आज शनिवारी ३० एप्रिलला राज्यात १५५ नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ९९८ वर पोहोचली आहे. तर आज शनिवारी कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची (corona death) नोंद करण्यात आलीय. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १,४७,८४३ वर गेला आहे.

Corona News Updates
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मबाबत 'BCCI' अध्यक्षांचं मोठं विधान

दरम्यान, शनिवारी १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७७,२८,८९१ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.११ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर मृत्यूदर १.८७ एवढा झाला आहे. लॅबमध्ये आजपर्यंत दाखल केलेल्या ८,०१,८८,१४५ नमुन्यांपैकी ७८,७७,७३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या विभागात नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महानगरपालिका क्षेत्र - एमसीजीएम, ठाणे, टीएमसी, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, पालघर, वसई-विरार महानगरपालिका, रायगड, पनवेल महानगरपालिका - ११५ नवे कोरोना रुग्ण

नाशिक विभाग - नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, अहमदनगर, अहमदनगर महानगरपालिका, धुळे, धुळे महानगरपालिका, जळगाव, जळगाव महानगरपालिका, नंदुरबार - २ नवे कोरोना रुग्ण

पुणे विभाग : पुणे, पुणे महानगरपालिका, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर महानगरपालिका, सातारा - २७ नवे कोरोना रुग्ण

कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली, सांगली महानगरपालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी - एका नव्या कोरोना रुग्णाची नोंद

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, औरंगाबाद महानगरपालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महानगरपालिका, - ३ नवे कोरोना रुग्ण

लातूर विभाग : लातूर, लातूर महानगरपालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महानगरपालिका - २ नवे कोरोना रुग्ण

अकोला विभाग : अकोला, अकोला महानगरपालिका, अमरावती, अमरावती महानगरपालिका, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, - ४ नवे कोरोना रुग्ण

नागपूर विभाग : नागपूर, नागपूर महानगरपालिका, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, गडचिरोली - एका नव्या कोरोना रुग्णाची नोंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com