ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडुन ग्राहकाची फसवणूक? 6 दिवसात गाडी पडली बंद

कंपनीला वारंवार तक्रार देऊनही कंपनीचे ग्राहकांकडे दुर्लक्ष
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने, सरकारकडुन इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देवुन चालना देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे. बीडच्या परळी शहरातील ग्राहक सचिन गित्ते यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या 6 दिवसात बंद पडली. कंपनीला वारंवार तक्रार देऊनही कंपनीने ग्राहकाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं संतप्त झालेले ग्राहक गित्ते यांनी सदरील बंद पडलेली दुचाकी गाढवाला बांधत परळीतील (Parali) रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला. तसेच ओला कंपनीच्या दुचाकी फसव्या असून त्या घेवु नयेत असे नागरिकांना आवाहन केले आहे.

हे देखील पाहा -

परळी शहरातील व्यापारी सचिन गित्ते यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी 20 हजार रुपये भरत ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर ऑनलाईन बुकींग केली. 21 जानेवारी 2022 रोजी उरलेले 65 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी सदरील स्कुटी देण्यात आली. मात्र सहा दिवसानंतर ही दुचाकी बंद पडली. त्यानंतर कंपनीकडे संपर्क साधला कंपनीचा मेकॉनिक येवुनही दुचाकी सुरु झाली नाही. कंपनीकडुन हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर शोरुम नसल्याने सचिन गित्ते यांनी कष्टमर केअर नंबरवर फोन केला तिथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

Beed News
राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल; आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण

पैसे देवुन घेतलेली दुचाकी बंद पडल्याने व कंपनीकडुन कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी, बंद पडलेली दुचाकी गाढवाने ओढत गांधिगीरी केली. गाढवाच्या पाठीवर ओला कंपनीचा निषेध असलेले फलक लावुन, ओला या फसव्या कंपनीपासुन सावध रहावे. ओला कंपनीच्या दुचाकी खरेदी करु नका. असे जाहिरपणे सांगत राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रस्त्यावरुन गाढवाच्या पाठिमागे दुचाकी बांधत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला. सचिन गित्ते यांच्या या अनोख्या निषेधाची परळी शहरात चांगलीच चर्चा होत आहे.दरम्यान सरकारने या कंपनीची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी करत याबाबत ग्राहक मंचात देखील तक्रार केली असल्याचं सचिन गित्ते यांनी सांगितलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com