Nana Patole| शिंदे सरकार स्थापन करण्यात राज्यपाल कोश्यारींचा मोठा हात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे राज्यात भाजपचे राज्यपाल म्हणून काम करीत आहे. हे चुकीचे होतं आहे, असी खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केली.
nana patole news
nana patole news saam tv

Nana Patole News : 'आताचं सरकार असंवैधानिक आहे, कोर्टात प्रकरण सुरु असताना सरकार स्थापन करण्यात राज्यपाल यांचा मोठा हात आहे .राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे राज्यात भाजपचे राज्यपाल म्हणून काम करीत आहे. हे चुकीचे होतं आहे, अशी खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केली.

nana patole news
आतापर्यंत मी शांत होतो, कदाचित चित्रा वाघ यांना माहित नसेल, संजय राठोड यांचा सणसणीत इशारा

नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. नाना पटोले पुढे म्हणाले, 'राज्यपाल हे गुजरात व राजस्थान राज्याचं गुण गातात. महाराष्ट्रातील लोकांना हीन वागणूक देतात ही बाब गंभीर आहे'.

पटोले यांनी यावेळी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, ' या असंवैधानिक सरकारने पहिले काम बुलेट ट्रेनला मंजुरी देऊन केले. कालच साडेसहा हजार कोटी रुपये जाहीर केले आहे. इकडे राज्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदील झाला आहे. याकडे अजिबात लक्ष नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

nana patole news
जेव्हा गुलामी होती, तेव्हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले; केरळच्या राज्यपालांचं मोठं विधान

विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद हे अंबाद दानवे यांना मिळाले आहे. त्यावरून 'विधान परिषदेत विरोधी पक्षनेता पद हे शिवसेनेला मिळाले, त्याला आमचा विरोध आहे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com