युपीएससीच्या परीक्षेत तीनवेळा अपयश; नागपुरात युवकाची गळफास घेत आत्महत्या

तीनवेळा युपीएससीमध्ये अपयश आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Crime
CrimeSaam Tv

नागपूर: नागपुरात (Nagpur) एका २८ वर्षीय तरुणाने युपीएससीमध्ये (UPSC) तीनवेळा अपयश आल्याच्या नैराशातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नागपुरमधील जरीपटका भागातील रहिवासी असलेल्या ब्लेसन पुड्डू चाको अस या तरुणाचे नाव आहे. त्याने रविवारी घरी एकटा असताना बेडशीटने पंख्याला गळफास घऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली.

Crime
दुर्दैवी! बीड जिल्ह्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांची आत्महत्या

या तरुणाने बी टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली, पण या परिक्षेत त्याला तीनवेळा अपयश आले. यामुळे तो नैराश्यात गेला होता. रविवारी सकाळी त्याचे वडील बाहेर गेल्यानंतर त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी (Police)या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com