नागपूरात कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा!; जेवणाला चक्क गोडधोड

लोकं काय करतील याचा नेम नाही. कोल्हापूर मध्ये काही दिवसांपूर्वी एका जेसीबी चा वाढदिवस साजरा झाला होता.
नागपूरात कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा!; जेवणाला चक्क गोडधोड
नागपूरात कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा!; जेवणाला चक्क गोडधोडसंजय डाफ

नागपूर: लोकं काय करतील याचा नेम नाही. कोल्हापूर मध्ये काही दिवसांपूर्वी एका जेसीबी चा वाढदिवस साजरा झाला होता. आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात चक्क एका कोंबड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. मोठ्या थाटामाटात हा वाढदिवस साजरा झाला. कोंबड्याचा औक्षण करून त्याला गोडधोड खाऊ घालण्यात आलं. या वाढदिवसाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे.

नागपूरात कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा!; जेवणाला चक्क गोडधोड
डॉक्टरांचा अजब उपचार! मानसिक आजारावर विस्की अन् बिअरचा सल्ला

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याच्या मंगळवारी पेठ मध्ये राहणाऱ्या सुरभी कागदेलवार यांनी आपल्या घरी कोंबड्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी कोबड्याला औक्षण करून त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात आलं. वर्षभरापूर्वी हे कोंबड्याचं पिल्लू त्यांच्या दुकानासमोर फिरताना दिसलं. कुत्रा किंवा मांजर या पिलाला खातील या भीतीनं कागदेलवार कुटुंबियांनी या पिल्लाला आपल्या घरी आणलं. तेव्हापासून तो कागदेलवार कुटुंबातील सदस्य झालाय. त्याचं नावं कुचा ठेवण्यात आलंय. पोटच्या मुलाप्रमाणे ते या कोंबड्याचा सांभाळ करतात. काल तो एक वर्षाचा झाला. त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्याचं औक्षण आणि गोडधोड खाऊ घातलं.

कुचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबीयांचा सदस्य आहे. तो घरातील प्रत्येकाचं ऐकतो. एवढंच काय तर 'स्टेचू'केल्यावर हा कुचा अजिबात हलत नाही. त्यामुळं या कुचा नं घरातील सर्वांना लळा लावलाय. या कुचा चा कागदेलवार कुटुंबीय आयुष्यभर सांभाळ करणार आहेत. पशु, पक्षी आणि प्राण्यांवर प्रेम करा, त्यांच्यावर दया करा, हा संदेश कागदेलवार कुटुंबियांनी यातून दिलाय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com