नागपूरात सराफा लुटमार प्रकरणाचा पर्दाफाश; भाजयुमो कार्यकर्त्यासह 6 अटकेत

अवघ्या 10 तासात आरोपींना अटक
Arrest
ArrestSaam Tv

संजय डाफ

नागपूर : नागपूरात सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी 10 तासात अटक केलीय. यात एका भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्याही समावेश आहे. शनिवारी दुपारी पाचपावली पुलावर ही घटना घडली होती. आरोपींची चाकूने प्राणघातक हल्ला करून दागिने आणि दुचाकी वाहन लुटून नेले होते. या प्रकरणामुळे शहरातील सराफा व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पाचपावली पोलिस ठाण्याजवळच ही घटना घडल्याने पोलिसांवरही मोठा दबाव होता. मात्र पोलिसांनी केवळ 10 तासात या प्रकरणाचा छडा लावून भाजयुमो कार्यकर्त्यासह 6 आरोपींना अटक केली आहे.

Arrest
Satara Breaking News: गुणरत्न सदावर्तेंची न्यायालयीन काेठडीत रवानगी

बिट्टू समसेरिया असे या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. केतन कामदार यांचे पायल ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. ते इतर सराफा व्यवसायिकांकडून थोकमध्ये दागिने बनविण्याचे काम घेतात. शनिवारी दुपारी केतनने काही दुकानदारांकडून सोन्याचे दागिने घेतले. सर्वात शेवटी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ते कमाल चौकाजवळील गुरुदेव ज्वेलर्समध्ये पोहोचले. तेथूनही त्यांनी काही दागिने गोळा केले. त्यानंतर दुचाकी वाहनाने पाचपावली पुलावरून गांधीबागकडे जात होते. पुलावरच तीन आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. डोळ्यात मिरची पावडर फेकून वाहनासह दागिने लुटले.

हे देखील पहा-

वाहनाच्या डिक्कीत 500 ग्रॅम सोने आणि 3 किलो चांदी ठेवलेली होती. आरोपींनी काही दूर गेल्यानंतर पाचपावली परिसरातच केतनचे वाहन सोडले आणि दागिन्यांसह फरार झाले. दिवसाढवळ्या लाखोंच्या लुटीने पोलिसात खळबळ उडाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काहीही करून आरोपींना शोधून काढण्याचे निर्देश दिले. गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित आणि झोन 3 चे गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या पथकांनी काम सुरू केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यास सुरुवात झाली. 10 तासांच्या प्रयत्नातून पोलिसांनी अटक केली.।पोलिसांच्या का कारवाईमुळं पोलीस आयुक्तांनी कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com